कामगार कल्याण विभाग

Select Initiatives

पुरस्कार आणि गौरव

गुणवंत कामगार पुरस्कार

दरवर्षी कर्मचार्‍यांना (वर्ग-१ आणि २ संवर्गातील प्रत्येकी एक कर्मचारी, वर्ग-३ मधील ३ कर्मचारी आणि वर्ग-४ मधील १३ कर्मचारी) शाल, प्रमाणपत्र आणि २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन गुणवंत कामगार पुरस्काराने गौरविण्यात येते. महाराष्ट्र सरकारने या पुरस्कारासाठी काही नियम तयार केले आहेत. त्यानुसार हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

आवश्यक कागदपत्रे

  • लेखी अर्ज
  • मार्च महिन्याचे पगार पत्रक

निवृत्त कर्मचार्‍यांसाठी गौरव कार्यक्रम

दर महिन्याच्या शेवटी पुणे महानगरपालिकेतील निवृत्त कर्मचार्‍याच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन कर्मचार्‍याचा गौरव करण्यात येतो.