पथ विभाग

Select PROJECTS & INITIATIVES

रस्ते मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली (आरएएमएस)

  • रस्ते मालमत्ता व्यवस्थापन प्रणालीमुळे महानगरपालिकेच्या रस्ते विभागाला रस्त्यासंबंधी माहितीचे व्यवस्थापन करता येते.
  • या प्रणालीमध्ये रस्त्यांबाबतची शिस्तबद्ध माहिती संकलन करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. सर्व श्रेणीतील रस्त्यांची माहिती या प्रणालीमध्ये गोळा करण्यात आलेली आहे.
  • रस्ते विभागाकडे मर्यदित स्रोत उपलब्ध असतात. या प्रणालीमुळे रस्ते विभागाला दुरुस्ती आणि देखभालीसाठी रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यास मदत होते.
  • देखभाल स्रोतांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि नियंत्रण राखण्यासाठी या प्रणालीचा वापर होतो.
  • यामध्ये माहितीच्या आधारावर प्रत्येक विभागातील रस्त्यांसाठी देखभाल निधीचे वाटप केले जाते.
  • रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी नेमका किती खर्च लागतो हे तपासण्याचा मुख्य उद्देश ही प्रणाली वापरण्यामागे आहे.
  • महापालिकेतील अधिकार्‍यांना अर्थसंकल्पाचे नियोजन करतानादेखील या माहितीचा उपयोग होतो.