पथ विभाग

Select PROJECTS & INITIATIVES

रोड मेंटेनन्स व्हॅन

  • रस्ते विभागाने पुणे शहरातील चार विभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर ४ रोड मेंटेनन्स व्हॅनच्या नियुक्तीसाठी निविदा काढली होती.
  • रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पाहण्यासाठी रोड मेंटेनन्स व्हॅन २४ तास रस्त्यावर उपलब्ध असेल.
  • या व्हॅन रस्ते विभागाच्या ‘रोड मेंटेनन्स मोबाईल अॅप’ला जोडलेल्या असतात. विभागातील सर्व कनिष्ठ अभियंते या अॅपचा वापर करतात.
  • नागरिकांना रस्त्यांसंबंधी तक्रारी दाखल करण्यासाठी टोल फ्री क्रमांक दिलेला असतो.
  • सहाय्यक कार्यालयातून (बॅक ऑफिस) या तक्रारी कनिष्ठ अभियंत्यांना कळविल्या जातात. हे अभियंते रोड मेंटेनन्स व्हॅनच्या मदतीने दुरुस्तीची कामे पुर्ण करतात.
  • रोड मेंटेनन्स व्हॅनमुळे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण जलदगतीने होत असून तक्रार निवारणासाठी लागणारा वेळदेखील कमी होत आहे.
  • चार रोड मेंटेनन्स व्हॅनचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर विभागाने आणखी ८ रोड मेंटेनन्स व्हॅन सादर करण्याचा निर्णय घेतला.