उदयान विभाग

Select THEME PARKS

संभाजी पार्क मत्स्यालय

थीम- मत्स्यालय

पुणे महानगरपालिकेने १९५३ साली छत्रपती संभाजी उद्यान येथे ताज्या पाण्यात राहणाऱ्या माशांसाठी मत्स्यालय सुरु केले. संभाजी उद्यान हे लहान मुले, तरुण आणि जेष्ठ नागरिक अशा सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी उत्कृष्ठ जागा आहे. भरपूर मोकळी जागा आणि जॉगिंग ट्रॅकमुळे मॉर्निंग वॉक आणि व्यायामप्रेमींसाठी तर हे आवडीचे ठिकाण आहे. उद्यानात मत्स्यालय, बालकांसाठी लहान किल्ला आणि उद्यानाच्या मध्यभागी असणाऱा मोठा कारंजा उद्यानाची शोभा आणखी वाढवतात. लहान मुलांसाठी खेळायला भरपूर खेळणीदेखील आहे. दिवसभर अनेकजण येथील वृक्षांच्या छायेखाली विश्रांती घेताना दिसतील. लहान मुलांना येथील मत्स्यालयाचे विशेष आकर्षण असून यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडत आहे.

उद्यानातील आकर्षणे

मत्स्यालय - संभाजी उद्यानात एक छोटेसे मत्स्यालय आहे जेथे मत्स्यप्रेमींना विविध प्रजातींचे मासे पाहायला मिळतील. विशेषतः लहान मुलांना  या मत्स्यालयाचे विशेष कुतुहल आहे.

दुर्मिळ वृक्ष - मणी मोहर, रुद्राक्ष, कैलासपती, गोल्डन बॉटल ब्रश, भद्राक्ष, सिताशोक आणि कांचन यासारखी अत्यंत दुर्मिळ झाडे या उद्यानात आढळून येतील.

प्रदर्शने - पुणे महापालिकेकडून दरवर्षी उद्यानात फुलांचे, किल्ल्यांचे वैविध्यपुर्ण प्रदर्शने आयोजित केली जातात. उद्यानात दिवाळीमध्ये किल्ले स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धक उद्यानात येऊन किल्ला तयार करतात.

चौपाटी - उद्यानातून बाहेर पडल्यानंतर लगेचच खाद्यप्रेमींसाठी चौपाटी सज्ज आहे. येथे तुम्हाला भेळपुरी, पाणीपुरी, वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स दिसतील.

प्रवेश शुल्क

उद्यानप्रवेश मोफत

प्रौढ – प्रत्येकी २० रुपये

बालके- प्रत्येकी १० रुपये

उद्यानाच्या वेळा

मत्स्यालय बुधवारी बंद असते.

वेळ- दररोज स. ८.३० ते ११.३०

दररोज सायं. ४ ते ८.३०

पत्ता- जंगली महाराज रोड

Google Map