क्रीडा विभाग

Select DEPARTMENT INITIATIVES

कै. बाबुराव सणस मैदान

कै. बाबुराव सणस मैदान  

पुणे महानगरपालिकेने सन २००६ मध्ये कै.बाबुराव सणस मैदान विकसित केले आहे. मैदानावर ८ x ४०० मीटर आधुनिक पध्दतीचा आंतरराष्ट्रीय अॅrथलेटिक ट्रॅक विकसित करण्यात आला असून विविध प्रकारच्या अॅथलेटिक स्पर्धा याठिकाणी आयोजित केल्या जातात. यामध्ये १०० मी, ४०० मी, ८०० मी प्रकारातील धावण्याच्या स्पर्धा तसेच अडथळा शर्यती आयोजित करण्यात येतात. मैदानावर दोन ठिकाणी लांब उडीचे प्लॉट तयार केले असून या क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा याठिकाणी आयोजित करण्यात येतात. गोळाफेक, थाळीफेक, हातोडाफेक या स्पर्धांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. उंच उडी या खेळासाठी स्वतंत्र प्लॉट असून स्पर्धेसाठी उंच उडीच्या मॅट उपलब्ध करून दिल्या जातात.

कै.बाबुराव सणस मैदान येथे यापुर्वी २ वेळा एशियन ग्रॅडपिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कै.बाबुराव सणस मैदान येथे दररोज ५००-६०० खेळाडू अॅयथलेटिक्स खेळांचा सराव करीत असतात. या मैदानावर ललिता बाबर, भाग्यश्री शिर्के या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सराव केला आहे. 

वसतिगृह सुविधा 
पुणे शहरात होणार्याि विविध क्रीडा स्पर्धांसाठी पुण्यात येणाऱ्या बाहेरगावच्या खेळाडूंना कै. बाबुराव सणस मैदान येथील वसतिगृहातील खोल्या नाममात्र दरात (प्रतिदिन/प्रतिखोली रू.५६०/- करांसहित) निवासासाठी उपलब्ध करून देण्यात येतात. याठिकाणी एकूण ८० खोल्या व २ डॉरमेंट्री आहेत. विविध स्पर्धांसाठी बाहेरगावहून येणार्या  खेळाडूंना ही जागा स्पर्धेच्या कालावधीदरम्यान उपलब्ध करून देण्यात येते.  वसतिगृहामधील सर्व खोल्या सुसज्ज असून प्रत्येक खोलीमध्ये पुरेशी प्रकाशव्यवस्था तसेच २४ तास पाणी, टॉयलेट बाथरूम व ३ बंकबेडची व्यवस्था आहे. भविष्यात याठिकाणी सोलर यंत्रणेव्दारे २४ तास गरम पाणी, प्रत्येक खोलीत दूरदर्शन संच, इंटरनेट सुविधा अशाप्रकारच्या सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.  

क्रीडा संग्रहालय व क्रीडा माहिती केंद्र 
पुणे महानगरपालिकेच्या कै. बाबुराव सणस मैदानाच्या आवारात क्रीडा संग्रहालय व क्रीडा माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या संग्रहालयाद्वारे पुणे शहरातील खेळांडूना विविध खेळांविषयक माहिती उपलब्ध करून देण्याचा हेतू आहे. येथील पुस्तके, क्रीडा साहित्याच्या माध्यमातून विविध खेळ, खेळाडू आणि जागतिक स्तरावरील विविध स्पर्धांबाबत जागरुकता निर्माण करण्याचा उदेश आहे. क्रीडा माहितीविषयक स्वतंत्र एक भाग असावा जेणेकरून पुणे महानगरपालिका हददीमधील नागरिकांना क्रीडाविषयक बाबींची माहिती सहज उपलब्ध करुन देण्याचा हाही उद्देश त्यामागे आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंची माहिती अदयायावत करता येईल व क्रीडा विषयाची माहिती व उपक्रमाचा प्रचार करण्यास मदत होईल. 

कै. बाबुराव सणस क्रीडांगण वापराबाबत नियमावली 

  1. कै. बाबुराव सणस क्रीडागंण (सारसबाग) मधील मैदानी क्रीडांगण, बॅडमिंटन हॉल व निवासी सदनिकांच्या अनुषंगाने कै. बाबुराव सणस क्रीडागंण (सारसबाग) नियमावली २०१३ असे संबोधण्यात येईल.
  2. कै. बाबुराव सणस क्रीडागंण (सारसबाग) मधील मैदानी क्रीडागंण, बॅडमिंटन हॉल व निवासी सदनिकाच्या वापराच्या अनुषंगाने नियम करण्यासाठी मा. स्थायी समितीकडून ठराव संमत करण्यात आलेला आहे.
  3. कै. बाबुराव सणस क्रीडागंण येथील मैदानी क्रीडागंण व ट्रॅकचा वापर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे यापुढे कै. बाबुराव सणस क्रीडागंण (सारसबाग) नियमावली २०१३ ची अंमलबजावणी करण्यात येईल.
  4. कै. बाबुराव सणस क्रीडागंण येथील मैदानी क्रीडागंणामध्ये धावण्याचा ४०० मिटर सिंथेटिकचा ट्रॅक असून हा वापरण्यास देण्यासंबंधी शासकीय संस्था, शासनमान्य क्रीडा संस्था, शासन मान्य शाळा व महाविालये यांचेसाठी प्राधान्यक्रम राहील.