Quick Links

Overview & Functioning

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम 66(21)(42) नुसार पुणे महानगरपालिकाच्या पर्यायी कर्तव्यांमध्ये माध्यमिक आणि तांत्रिक शिक्षणाचा समावेश होतो. पुणे महानगरपालिकेने १९५३ साली झोपडपट्टीत राहणाऱ्या एकूण लोकसंख्येच्या ३५ टक्के आर्थिकदृष्ट्या कमकुवत, शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि पुण्यात स्थलांतरित झालेल्या झोपडपट्टीतील लोकसंख्येच्या ११ ते १८ वयोगटातील लहान मुलांसाठी माध्यमिक शाळा सुरू केली.

सध्या पुणे महानगरपालिकेतर्फे शहरात एकूण चाळीस माध्यमिक शाळा आणि एक रात्र महाविद्यालय यशस्वीरित्या चालविले जाते. या चाळीस शाळांपैकी एकोणवीस शाळा मराठी उच्च माध्यमिक (३ ज्युनिअर कॉलेजसह) असून ४ उर्दू माध्यमिक शाळा (२ उर्दू विज्ञान कनिष्ठ महिला महाविद्यालय) आहेत. यासोबतच, एक मराठी रात्र महाविद्यालय, एक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि एक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणारी संस्थादेखील महानगरपालिकेतर्फे चालविली जाते. याशिवाय, महानगरपालिकेमार्फत सामाजिक संस्थांच्या सहाय्याने पंधरा इंग्रजी शाळा व दोन मराठी शाळा चालविल्या जातात. पुणे महानगरपालिकेने नुकतीच एका सामाजिक संस्थेच्या साह्याने कला आणि वाणिज्य शाखांच्या रात्र महाविद्यालयाची स्थापना केली आहे.  

पुणे महानगरपालिकेने राजीव गांधी ई-लर्निंग अकादमी या विशेष संस्थेची स्थापना केली आहे. अकादमीत बालवाडी ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. दहावीपर्यंत सेंट्रल बोर्डाचे शिक्षण असून कनिष्ठ महाविद्यालय व व्होकेशनल विषयांसाठी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. कनिष्ठ महाविद्यालय सामाजिक संस्थेच्या(एनजीओ) सहकार्याने चालविले जाते. महानगरपालिकेने काही ठराविक शाळांमध्ये केंद्र सरकारच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कला सुरुवात केली आहे. या योजनेत विद्यार्थ्याला हिंदी आणि सामाजिक शास्त्रांसारख्या विषयांऐवजी मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स, रिटेल, बँकिंग व फायनान्स, टुरिझम, कृषी आणि वाहन यासारखे व्यावसायिक विषय निवडता येतात.

 

समाजातील वंचित व दुर्बल घटकांपर्यंत उत्कृष्ट सेवा पोचवून समाजाचा विकास घडवून आणणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. पारंपरिक शिक्षणापलीकडे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीकोनातून उच्च दर्जाच्या सेवा देण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या विभागामार्फत खालील सेवा दिल्या जातात-

 • इयत्ता नववी व दहावीच्या मुलांसाठी मोफत पाठ्यपुस्तके
 • एसएसए योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत मोफत पाठ्यपुस्तके
 • इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य २१ अपेक्षित(नवनीत)
 • पीएमपीएमएल बसेसचे मोफत पासेस
 • राजीव गांधी ई-लर्निंग अकादमीमध्ये इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी दुहेरी अभ्यासक्रमावर लक्ष
 • इयत्ता दहावी व बारावीमध्ये अनुक्रमे ८० व ८५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शारदाबाई पवार यांच्या नावाने ५१,००० रुपयांची शिष्यवृत्ती
 • विविध शाळांमध्ये नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कची सुरुवात 
 • कला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन
 • विज्ञान आणि भूगोल प्रदर्शनाचे आयोजन
 • प्रत्येक शाळेत स्काउट आणि गाइड युनिट चालविले जाते.
 • शैक्षणिक सहलींचे आयोजन
 • विद्यार्थ्यांसाठी मोफत पुणे दर्शन सहल
 • सांस्कृतिक सभांचे आयोजन
 • दोन मोफत गणवेश
 • औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.)
 • कॉर्पोरेट सामाजिक जबादारीअंतर्गत(सीएसआर) विविध उपक्रमांचे आयोजन
 • मुलींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन
 • प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन बिस्किटांचे मोफत वितरण
 • विभागातर्फे विद्यार्थ्यांना टॅबचे विनामूल्य वाटप केले जाते
 • राज्य सरकारकडील शिक्षणाधिकारी - १
 • पुणे महानगरपालिकेकडील उपशिक्षणाधिकारी- १
 • पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधून निवडलेले पर्यवेक्षक-४
 • मान्यताप्राप्त शिक्षक: २५१
 • मान्यताप्राप्त शिक्षकेत्तर कर्मचारी :१०५
 • वार्षिक बजेटः ६०,९९,२००० / -
 • एस.एस.सी. निकाल: ८१.३७% (२०१८-१९)
 • एच.एस.सी. निकाल: ८३.३०% (२०१८-१९)
 • विद्यार्थ्यांची एकूण संख्या: १२५००

Array

image