उदयान विभाग

Select THEME PARKS

शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान

थीम- भारतीय सैन्य आणि राष्ट्रभक्तीला सलाम

शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान हे शहरातील एक प्रमुख लँडमार्क आहे. जम्मू येथे २००० साली अतिरेक्यांशी लढताना स्वतःचे प्राण गमावलेल्या मेजर प्रदीप ताथवडे यांचे नाव उद्यानाला देण्यात आले आहे.  प्रवेशद्वारावर मेजर ताथवडे यांचा मोठा पुतळा आहे. याशिवाय, पाण्याचे कारंजे, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आणि कृत्रिम तलाव ही उद्यानातील काही प्रमुख आकर्षणे आहेत. पुणे महापालिकेला भारतीय सैन्याकडून भेट मिळालेला भारत-पाकिस्तान लढाईत १९७१ साली वापरण्यात आलेला रणगाडा या उद्यानात ठेवण्यात आलेला आहे.

उद्यानातील आकर्षणे

हिरवळ आणि स्टेज - नागरिकांसाठी गवतावर मोठं व्यासपीठ आहे. समोर नागरिकांना बसण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागा असल्यामुळे येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

योग केंद्र - उद्यानाच्या मध्यभागी योग करण्यासाठी एक छोटीशी जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसंच लहानशा तलावातील छोटे मासे उद्यानाची शोभा वाढवतात.

विविध वृक्ष - उद्यानात आंबे, लिंब, पिंपळासारखे अनेक भव्य वृक्ष असून गुलाब, जाई-जुईच्या फुलांची झाडं दिसतील.

                - उद्यानाबाहेर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स नाहीत. तसंच मैदानी खेळ आणि पाळीव प्राण्यांना उद्यानात प्रवेश नाही.

प्रवेश शुल्क

प्रौढ- १ रुपया प्रवेश शुल्क

बालके- ५० पैसे

उद्यानाच्या वेळा

  • दररोज स. ६ ते १०.००    
  • दररोज सायं. ४ ते ८.३०

पत्ता- कर्वेनगर, हिंगणे बुद्रुक

Google Map