1. शहरातील एकात्मिक झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यांतर्गत पुणे महानगरपालिकेने पर्यावरणीयदृष्ट्या धोकादायक / पर्यावरणास धोकादायक किंवा सार्वजनिक कामासाठी ताब्यात घेणे आवश्यक असलेल्या झोपडपट्टीच्या जागांच्या पुनर्वसनासाठी प्रकल्पांची अंमलबजावणी सुरु केली आहे. हडपसर आणि वारजे (जी+४) आणि (पी+७) येथील प्रकल्पांचे बांधकाम सुरू झाले आहे. इमारतींचे बांधकाम एकत्रित स्लॅब काँक्रीटच्या भिंती आणि अॅल्युमिनियमच्या स्वरूपात तंत्रज्ञान वापरून काम केले आहे. मिव्हन (अॅल्युमिनियम शटरिंग) चा वापर जलद गती बांधणीसाठी केला जातो. एक मजला (16 फ्लॅट्स) 21/2 मासिक चक्राद्वारे बांधला जातो. शहर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत बीएसए संकुल I आणि II हडपसर डीयू 2408 आणि पॅकेज III वारजे 1344 डीयू येथे स्थलांतरित करण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. वारजे येथील प्रकल्पाची किंमत २०,१४८.१४ लाख रुपये आहे. तर हडपसर आणि वारजे येथे एकूण सर्व प्रकारचे ३७५६ डीयूज बांधकाम होणार आहे. १४३३ डीयूज हे हडपसर आणि १२७८ डीयूज हे वारजे येथे लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. हडपसर आणि वारजे या प्रकल्पांसाठी आतापर्यंत रुपये १४९५७.२३ लाख खर्च झाले आहेत.
-
रस्त्यावरील विक्रेत्यांचे पुनर्वसन - रस्त्यावरील विक्रेत्यांचे पुनर्वसन करून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (माल ठेवण्याची जागा, आच्छादित परिसर, शौचालयाची सुविधा, पिण्याचे पाणी, विक्रीसाठी फलाटाची सुविधा, लोडिंग-अनलोडिंगसाठी जागा). वडगाव बुद्रुक, वडगाव शेरी, खराडी, बाणेर, पर्वती या ठिकाणी एकूण ९५७ ओटे बांधण्यात आले आहेत. या प्रकल्पाची एकूण किंमत १४८०.९२ लाख असून आतापर्यंत ९२९.३४ लाख रुपये खर्च झालेआहेत. सर्व ओढे आणि जागा पुणे महानगरपालिकेचा मालमत्ता विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत.
-
बीएसयुपी अंतर्गत पुणे शहरातील झोपडपट्टीमध्ये लोकांना राहण्याकरिता INSITU पुनर्वसन (वाढीव गृहनिर्माण) योजना आहे. या योजनेअंतर्गत येरवडा आणि तळजाई येथील सर्व झोपड्या या शासनाच्या आणि/किंवा महानगरपालिकेच्या जागेवर आहेत. विकास आराखड्यानुसार प्रस्तावित झोपड्या या कोणत्याही आरक्षणापासून मुक्त असून त्या स्पष्टपणे निवासी भागातील आहेत. केंद्र सरकारने ४००० युनिट मंजूर केले असून त्याची किंमत रुपये ११९३४.४४ लाख आहे. त्यापैकी आतापर्यंत ९७९८.६५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ३८९७ घरे बांधणे सुरू असून त्यापैकी ३५२८ घरे पूर्ण झाली असून लाभार्थी या घरांमध्ये स्थानांतरित झाले आहेत.