पथ विभाग

Select PROJECTS & INITIATIVES

स्मार्ट पदपथ

पादचारी, सायकलस्वार आणि दिव्यांगांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर रस्ते हा स्मार्ट वाहतूक यंत्रणेतील महत्त्वाचा घटक आहे. भारतातील बहुतांश प्रमुख रस्त्यांवर मोटारीवर चालणार्‍या वाहनांना प्राधान्य मिळते. मात्र, स्मार्ट रस्त्यांवर या सर्व घटकांना सारखेच स्थान मिळायला हवे. विद्यमान रस्त्यांमध्ये काही बदल करुन सायकल ट्रॅक, फूटपाथला पुरेशी जागा मिळेल अशी तरतूद केली जाणार आहे. याशिवाय, व्यावसायिक हेतू, पादचारी, सायकल, वाहनांना वापरण्यासाठी रस्त्यांची योग्य विभागणी करण्याचा महापालिकेचा हेतू आहे.

  • स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत औंध येथील डीपी रोडवर पदपथ तयार करण्यात आला
  • सात दिवसांमध्ये 500 मीटरचा रस्ता तयार करण्यात आला
  • यादरम्यान, रस्त्यावरुन केवळ एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली
  • त्यानंतर दररोज ३००० लोकांनी या रस्त्याचा वापर केला

काहींनी या प्रयोगाला साह्य केले तर काहींनी विरोध केला. मात्र, शहरी विकासासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी या प्रयोगाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

लोकांनी मांडलेली मते

  • जेष्ठ नागरिकांसाठी उडान शटल उपयोगी
  • भविष्यकाळ लक्षात घेता चालणे, सायकलिंग आणि सार्वजनिक वाहतूक अधिक उपयोगी
  • शहरातील इतर रस्त्यांवर विशेषतः एमजी रोडवरदेखील असा प्रयोग व्हायला हवा

सारांश

  • शेजारच्या रस्त्यावरील ट्रॅफिक सिग्नल संरेखित करण्याची गरज
  • रस्त्यांवरील चिन्हे अधिक स्पष्ट असावीत
  • लोकांमध्ये या मार्गांविषयी अधिक जनजागृती निर्माण करण्याची गरज

नागरिकांचा सहभाग

नागरिक अभिप्राय उपक्रम