स्मार्ट रेन ट्रॅकर

‘स्मार्ट रेन ट्रॅकर’ हे पावसाचे बिनचूक पद्धतीने मोजमाप करणारे स्वयंचलित यंत्र असून, याद्वारे ऑनलाईन पोर्टल तसेच मोबाईल क्रमांकावर पावसासंदर्भातील आकडेवारी पाठविली जाते. त्यानंतर, ही सर्व माहिती साठविली जाते व त्यावर प्रक्रिया करुन अहवाल तयार केला जातो. तसेच यासंदर्भात समोर येणारा इशारादेखील सामील घटकांना ईमेल आणि एसएमएस नोटीफिकेशन्सद्वारे पाठविला जातो.

  • स्मार्ट रेन ट्रॅकरमुळे कोणतीही आपत्ती उद्भविल्यानंतर सर्व पीडित संस्था आणि व्यक्तींना त्यांच्या मोबाईलवर आणि ईमेलवर वेळोवेळी स्वयंचलित अॅलर्ट मिळतील.
  • शेतकरी, सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शाळा, महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था व माध्यमांना या यंत्रणेतून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग होऊ शकतो.
  • यंत्रणेचे व्यवस्थापन करण्यासाठी मानवी व्यवस्थापनाची आवश्यकता नाही.
  • यामुळे आपले कष्ट, वेळ आणि पैसा वाचण्यास मदत होते.
  • अचूक निरीक्षण आणि मानवी हस्तक्षेप/चूक नाही
  • आपत्ती आणि आणीबाणीच्या परिस्थितीत 100% अचूक माहिती मिळाल्यास मनुष्याचा त्रास व मौल्यवान वेळ वाचण्यास मदत होते.

Pmc Care Master Tag: