Quick Links
बाह्य दुवे
-- परिणाम आढळला नाही --
OVERVIEW & FUNCTIONING
पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाचे कार्यालय, पंडित नेहरू स्टेडियम, स्वारगेट, पुणे येथे आहे. पुणे शहरातील जवाहरलाल पं. नेहरू स्टेडियम, कै. बाबुराव सणस मैदान, कै. जन. अरूणकुमार वैद्य स्टेडियम, हडपसर हॅन्डबॉल स्टेडियम ही मैदाने तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडासंकुल येथील जलतरण तलाव व स्केटिंग रिंकची मालकी या विभागाकडे आहे. सदर मैदाने पुणे शहरातील खेळाडूंना सरावासाठी व स्पर्धांसाठी उपलब्ध करून देण्यात येतात व त्याचे व्यवस्थापन क्रीडा विभागामार्फत केले जाते.
पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा धोरणानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतील खेळाडूंसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण १३ सदस्यांची क्रीडा समिती अस्तित्वात आहे.
पुणे महानगरपलिकेतर्फे महानगरपालिका हद्दीत राहणार्याी उदयोन्मुख खेळाडूंना तसेच विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंना अंदाजपत्रकातील उपलब्ध तरतुदींनुसार अर्थसहाय्य (शिष्यवृत्ती) दिले जाते.
पुणे महानगरपालिका क्रीडा पुरस्कार धोरणानुसार महानगरपालिकेतर्फे पुणे शहरातील खेळाडू/प्रशिक्षक आणि क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देण्यात येतात. याशिवाय, क्रीडा विभागामार्फत संबंधित मान्यताप्राप्त जिल्हा संघटनेच्या सहकार्याने पुणे महापौर चषकाअंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.
पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा धोरणानुसार क्रीडा समिती व क्रीडा विभागाचे कामकाज चालते. क्रीडा विभागाकडे खालील कामे सोपविण्यात आलेली आहेत-
अ) पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेली मैदाने व क्रीडा संकुले देशी व विदेशी खेळांच्या सरावासाठी व स्पर्धांकरिता उपलब्ध करून देणे
ब) पुणे महापौर चषकांतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे
क) विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंना पुरस्कार, शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य देणे
ड) अनिवासी क्रीडा निकेतन
इ) मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांना क्रीडा साहित्य खरेदी, व्यायामशाळेचे बांधकाम व व्यायामशाळा अद्ययावत करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे
ह) कै. बाबुराव सणस क्रीडा वसतिगृह येथे स्पर्धेसाठी बाहेर गावाहून येणाऱ्या खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था करणे
DEPARTMENT INITIATIVES
Media Gallery
पाने
-- कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत --