Quick Links

Array

पुणे महानगरपालिकेचा मध्यवर्ती भांडार विभाग सन १९५० मध्ये स्थापन झाला. भांडार विभागप्रमुख यांच्या नियंत्रणाखाली या मध्यवर्ती भांडार विभाग नियंत्रण केंद्राचे कार्य चालते. विभागामार्फत पुणे महानगरपालिकेच्या इतर विविध विभागांना स्टेशनरी साहित्य /गणवेश, विद्युत उपकरणे / हार्डवेअर आदी वस्तू त्यांच्या मागणीनुसार पुरविल्या जातात. या प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम ७३ अन्वये जाहीर निविदा मागवून सर्वसाधारणपणे सर्वात कमी दर आलेल्या व उत्तम प्रतीच्या साहित्याची खरेदी करून मनपाचे हित लक्षात घेऊन साहित्य पुरविले जाते. 

पुणे महानगरपालिकेचा मध्यवर्ती भांडार विभाग विविध विभाग व विविध क्षेत्रीय कार्यालयांना स्टेशनरी/ गणवेश/ हार्डवेअर /विद्युत उपकरणे/ आरोग्य खात्यासाठी कीटक नाशक औषधे अशाप्रकारचे २९३ प्रकारचे साहित्य पुरवितो. हे साहित्य पुरवण्यासाठी विभागामार्फत निविदा काढली जाते. निविदेच्या प्रक्रियेमुळे निविदाधारकांमध्ये स्पर्धा निर्माण होते. यामुळे पुणे महानगरपालिकेला कमी दरात चांगल्या प्रतीचे साहित्य खरेदी करता येते. पर्यायाने, पुणे महानगरपालिकेचा आर्थिक लाभ करणे हा यामागील उद्देश आहे.

image