प्रधानमंत्री आवास योजना

Select PMAY Services

आर्धिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी व्यक्तिगत घरकुल बांधण्यास अनुदान

आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना व्यक्तीगत स्वरुपात घरकुल बांधण्यास अनुदान :-

आर्थिकदृष्या दुर्बल गटातील पात्र कुटुंबाना त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागेवर नविन घरकुल बांधण्यास अथवा राहत्या घराची वाढ करण्यास केंद्र शासनाकडून रक्कम रुपये 1.50 लक्ष पर्यत अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल. परंतु अशा लाभार्थ्याचा समावेश सर्वासाठी घरे कृती आराखड्यात असणे आवश्यक आहे. या घटकाखाली राज्य शासनाचे अनुदान रुपये 1.00 लक्ष राहिल. अनुदानाची रक्कम राज्यस्तरीय मान्यता व सनियंत्रण समिती मान्य करील.पात्र लाभार्थ्याचा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह नागरी स्वराज्य संस्थेकडे योजनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार छाननी केली जाईल व लाभारर्थ्याची आर्थिक क्षमता विचारात घेऊन शहर विकास आराखड्याशी सुसंगत असणारे प्रस्ताव एकत्र करुन राज्यस्तरीय मान्यता व सनियंत्रण समितीसमोर मान्यतेसाठी सादर करतील.