जमिनीच्या पृष्ठभागावरील पाणी प्रक्रिया

सर्व पाणी प्रक्रिया केंद्रांमधील पाणी प्रक्रियेचा क्रम सारखाच असतो. पाण्यातील रोजजंतूंचा नाश करून त्यातून संसर्ग होऊ नये, हाच पाणी प्रक्रिया प्रकल्पाचा प्रमुख उद्देश असतो.

  • पाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये सर्वप्रथम ताज्या पाण्यासोबत प्रक्रिया करावयाच्या पाण्याचा कार्बन डायऑक्साईडशी संयोग करण्यात येतो. जेथे पाण्याचा वातावरणातील हवेशी संपर्क येतो आणि पाण्यातील काही घटकांचा ऑक्सिजनशी संयोग होतो. बहुतेक प्रक्रिया केंद्रांमध्ये या पद्धतीची व्यवस्था नसते.
  • त्यानंतर पाण्यामध्ये काही रसायने आणि तुरटी सोडण्यात येते. त्यामुळे पाण्यातील कचरा तळाशी साठतो.
  • आतापर्यंत प्रक्रिया झालेले पाणी मोठ्या टाक्यांमध्ये एकत्र करण्यात येते. तेथे पाण्यातील उर्वरित गाळ काढण्यात येतो.
  • यानंतर पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यासाठी प्रामुख्याने क्लोरिनचा वापर करण्यात येते. त्यानंतर स्वच्छ झालेले पाणी वितरणासाठी एकत्र केले जाते.
  • पाण्यावरील प्रक्रियेतून निर्माण झालेल्या गाळातून आणखी पाणी काढण्यात येते आणि ते गटारांमध्ये सोडण्यात येते.
  • Sludge from clarifiers and filter backwash water are generally discharged into the nearby drain, however, there is a trend now to reuse / treat these wastes.

पाण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर आढावा :

ऑपरेशन / प्रक्रिया

अनुप्रयोग

गाळ काढणे

यामध्ये पाण्यातील शेवाळे आणि सूक्ष्म जीवाणू काढून टाकण्यात येतात.

वायूवीजन (वायूंशी संयोग)

या प्रक्रियेत पाण्याचा दुर्गंध काढून टाकण्यात येतो. त्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करण्यात येतो.

मिश्रण

पाण्यामध्ये रसायने आणि वायू सोडण्यात येतात.

प्री-ऑक्सिडेशन

या प्रक्रियेमध्ये पाण्याला आलेली चव, दुर्गंध आणि रंग काढून टाकण्यासाठी ओझोन, पोटॅशिअम परमॅगनेट आणि क्लोरिनसारखे घटक मिसळले जातात. त्यामुळे पाण्याला नैसर्गिक अवस्थेतील गंध, चव आणि रंग प्राप्त होतो.

गोठण प्रक्रिया

पाण्यातील अनावश्यक घटक बाहेर काढण्यासाठी पाण्यावर गोठण प्रक्रिया केली जाते.

फ्लोक्युलेशन

या प्रक्रियेत पाण्यातील अनावश्यक घटक रासायनिक प्रक्रियेद्वारे पाण्यातून बाहेर काढले जातात.

उन्मळण प्रक्रिया

पाण्यावर प्रक्रिया करताना पाण्यामध्ये मिसळलेला घटक काढून टाकण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे पाण्यातील जड पदार्थ तळाशी साठतात.

गाळण प्रक्रिया

पाण्यामधील वाळू आणि तत्सम घटक बाहेर काढण्यासाठी ही गाळण प्रक्रिया केली जाते.

निर्जंतुकीकरण

पाण्यातून रोग निर्माण करणार्‍या जीवाणूंना नष्ट करण्यात येते. त्यासाठी अतिनिल किरणे आणि क्लोरिन, ब्रोमिन, आयोडिन, पोटॅशिअम परमॅगनेट या घटकांचा वापर करण्यात येतो.