स्वच्छ सर्वेक्षण २०२२ - नागरिक सहभाग कार्यक्रम स्पर्धा

पुणे महानगरपालिकेतर्फे शहर स्वच्छतेबाबत नागरिकांच्या प्रतिबद्धतेसाठी विविध कलात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिंगल, लघुपट(शॉर्ट मूव्हीज), पोस्टर ड्रॉइंग, म्युरल्स आणि पथनाट्य(स्ट्रीट प्ले) या कलाप्रकारांचा समावेश आहे. २२ नोव्हेंबेर २०२१ ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये या स्पर्धा पार पडतील. तसेच स्पर्धेचे कामकाज करताना कोविड-१९चे सर्व नियम पाळण्याचे बंधन स्पर्धकांना असेल.

क्र.

 

स्पर्धेचे नाव  गट  नियम  बक्षीस 
१  जिंगल स्पर्धा  खुला गट  जिंगल जास्तीत जास्त २ मिनिटे आणि कमीत कमी १ मिनिट वेळेची असावी. 
जिंगल बनविताना मोबाइल अॅपचा वापर करण्यात यावा.
जिंगलमध्ये संगीतबरोबरच शब्दांकन असणे आवश्यक आहे. 
प्रथम : रु.७००० 
द्वितीय : रु.५००० 
तृतीय : रु.३००० 
शॉर्ट मूव्हीज  
(लघुपट)
स्पर्धा 
खुला गट शॉर्ट मूव्ही जास्तीत जास्त ५ मिनिटे वा कमीत कमी २ मिनिटे वेळेची असावी. 
शॉर्ट मूव्ही बनविताना मोबाइलद्वारे शूट करण्यात यावे. 
शॉर्ट मूव्हीमध्ये शहराचे नाव, स्वतःचे नाव, महानगरपालिका कोड ८०२८१४ हे दर्शविण्यात यावे. 
प्रथम : रु.१०००० 
द्वितीय : रु.७००० 
तृतीय : रु.५००० 
३  पोस्टर्स ड्रॉइंग स्पर्धा  खुला गट पोस्टर्सकरिता फूल अँपियर कागद/कार्डबोर्ड वापरावे. 
चित्र रंगविण्यासाठी माध्यम - वॉटर/पोस्टर कलर, ऑइल पेस्टल/ ब्लॅक पेन हे वापरावे. 
पोस्टर्सचे पाठीमागील बाजूस शहराचे नाव, स्वतःचे नाव, मोबाइल क्र., पत्ता व महानगरपालिका कोड ८०२८१४ नमूद करावे. 
प्रथम : रु.७००० 
द्वितीय : रु.५००० 
तृतीय : रु.३०००
४  म्युरल्स स्पर्धा  खुला गट म्युरल्स हे इको फ्रेंडली असावेत. यासाठी कागद, माती, लाकूड, साबण, कार्डबोर्ड, इ. साहित्य वापरावे. 
म्युरल्सची साइज कमीत कमी 2x2 फूट आणि जास्तीत जास्त 6x6 फूट असावी. 
प्रथम : रु.१०००० 
द्वितीय : रु.७००० 
तृतीय : रु.५०००
स्ट्रीट प्ले 
(पथनाट्य) स्पर्धा 
खुला गट स्ट्रीट प्लेमध्ये कमीत कमी ५ सदस्य असावेत. 
स्ट्रीट प्लेद्वारे स्वच्छतेबाबतची जनजागृती ज्या भागात केली जाईल, तेथील व्हिडिओ चित्रीकरण मोबाइलद्वारे करण्यात यावे. जास्तीत जास्त ५ मिनिटे व कमीत कमी ३ मिनिटे पथनाट्य असावे. 
व्हिडिओमध्ये शहराचे नाव, पथनाट्य ग्रुपचे नाव व महानगरपालिका कोड ८०२८१४ हे दर्शविण्यात यावे.
प्रथम : रु.१०००० 
द्वितीय : रु.७००० 
तृतीय : रु.५०००

 

स्पर्धेचे सर्वसाधारण नियम : 

१. सदर स्पर्धेकरिता प्रवेश विनामूल्य आहे.
२. सर्व स्पर्धांसाठी पुढील विषय आहेत :

 • हवेतील गुणवत्ता सुधार (Air quality improvement) 
 • स्वच्छ सर्वेक्षण 
 • आझादी का अमृतमहोत्सव 
 • SBM-II अंतर्गत विविध उपक्रम 
 • माझी वसुंधरा अभियान 
 • स्वच्छता विषयक जनजागृती 
 • कचरा वर्गीकरण 
 • प्लॅस्टिक बंदी 
 • हागणदारीमुक्त शहर 
 • पर्यावरण जागृती
 • सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज

३. सर्व स्पर्धांसाठी आवश्यक साहित्य हे स्पर्धकांचे असेल. 
४. सर्व स्पर्धांकरिता महानगरपालिका जाहीर करेल तो गुगल फॉर्म भरून स्पर्धेत प्रवेश घेणे अनिवार्य असेल. गुगल फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरून त्यावर आपले म्युरल्स आणि पोस्टर्स अपलोड करावयचे आहेत. तसेच जिंगल्स, शॉर्ट मूव्हीज आणि स्ट्रीट प्ले साठीचे गुगल फॉर्म भरून त्याचे ऑडिओ व व्हिडिओ मनपा मुख्य इमारत, दुसरा मजला, स्वच्छ सर्वेक्षण वॉर रूम याठिकाणी पेन ड्राइवद्वारे सादर करावयाचे आहेत. ही सर्व माहिती पूर्ण असलेले फॉर्म्स म्हणजेच स्पर्धकाची अंतिम प्रवेशिका समजली जाईल. गुगल फॉर्म साठी लिंक :
 

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ | Pune Municipal Corporation
 

५. म्युरल्स स्पर्धेकरिता गुगल फॉर्म भरून त्यावर म्युरल्सचे फोटो अपलोड करावेत. अंतिम परीक्षणाच्या वेळी महानगरपालिका सर्व स्पर्धकांसाठी ठिकाण निश्चित करून देईल व त्या ठिकाणी सर्व स्पर्धकांनी म्युरल्स घेऊन येणे आवश्यक असेल. 
६. स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकास धनादेशाद्वारे बक्षिसे देण्यात येतील. 
७. महानगरपालिकेने नेमलेल्या परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल. 
८. स्पर्धेतून जमा होणाऱ्या सर्व कलाकृती जिंगल्स, मूव्ही, पोस्टर, म्युरल, पथनाट्य शूटिंग यावर महानगरपालिकेचा अधिकार असेल. या कलाकृतींचा वापर महानगरपालिका शहरात जनजागृती करण्यासाठी करेल.