घनकचरा व्यवस्थापन विभाग

Select Initiatives

स्वच्छ पुरस्कार

अर्जाचा फॉर्म :

इंग्रजीमध्ये अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा मराठीमध्ये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पार्श्वभूमी 
महाराष्ट्रात मुंबईपाठोपाठ पुणे हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सुमारे ४० लाखाहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या पुणे शहराचा गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने विकास होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याला स्वच्छ शहर बनविण्यासाठी तसेच शहराचे भविष्य घडविण्यासाठी शहरात वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जातात. याशिवाय, शहरातील अनेक खासगी/सार्वजनिक संस्था, सामाजिक संस्था व कंपन्या शहरातील आरोग्य व स्वच्छतेची स्थिती सुधारण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम राबवित असतात. या सर्व घटकांच्या उत्कृष्ट कार्याला प्रोत्साहन मिळावी तसेच समाजात जनजागृती निर्माण व्हावी यासाठी या घटकांच्या प्रयत्नांना पुरस्कार देणे गरजेचे आहे. 

संकल्पना
'स्वच्छ पुरस्कारां'च्या माध्यमातून पुणे शहरात स्वच्छता आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सर्वोत्तम आणि अभिनव उपाययोजना राबविणाऱ्या घटकांचा(व्यक्ती/संघटना/ अधिकारी) सन्मान करण्याचा हेतू आहे. यासाठी विविध श्रेणींमध्ये होणाऱ्या नामनिर्देशनाच्या आधारे पुरस्कारार्थींची निवड केली जाणार आहे. यासाठी गुणांकन करणाऱ्या परीक्षकांमध्ये स्वच्छता क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ,  स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. 

पुरस्काराची उद्दिष्टे

  • स्वच्छता व आरोग्य क्षेत्रात विविध कार्य करणार्‍या घटकांना प्रेरित करणे
  • नागरिकांसह सर्व घटकांनी त्यांच्या प्रभागांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी सकारात्मक आणि स्पर्धेचे वातावरण तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणे
  • इतर ठिकाणी अवलंबिता येतील अशा प्रभावशाली व आदर्श कल्पना समोर आणणे 
  • सर्व घटकांमध्ये आपापसात माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी व्यासपीठ निर्माण करणे

​महत्त्वाच्या तारखा 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख-  ३० नोव्हेंबर २०१९
  • विजेत्यांची घोषणा- 

टीप :- तुमच्या अर्जामध्ये व्यवस्थित माहिती भरुन अर्जाची स्कॅन केलेली प्रत swmdata [at] punecorporation [dot] org या ई-मेलवर पाठवावी किंवा रुम.१२५, १ ला मजला, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महानगरपालिका येथे प्रत्यक्ष अर्ज जमा करावा.

पुरस्कार

माहिती पुस्तिका :

माहिती पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा स्वच्छ ब्रोशर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा स्वच्छ फ्लायर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जाचा फॉर्म :

इंग्रजीमध्ये अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा मराठीमध्ये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा