अमृत वाहिनी प्रकल्पांतर्गत देवाची उरळीत वृक्षारोपण

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानातंर्गत पुणे महानगरपालिका हद्दीत बगीचा क्षेत्र विकास (ग्रीन स्पेस डेव्हलेपमेंट) वाढविण्याच्या दृष्टीने सदर प्रकल्पास मंजुरी मिळाली. त्या अंतर्गत सन 2015-2016 - 100 लक्ष , 2016-2017 - 150 लक्ष व 2017-2018- 200 लक्ष असा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये केंद्र शासनाचे 50%, महाराष्ट्र राज्य शासनाचे 25% व पुणे महानगरपालिका 25% असे आर्थिक समभाग आहेत. सन 2015-2016 करिता स.नं. 152, हडपसर येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवर प्रकल्प पूर्ण करण्यात आला. सदर ठिकाणी एकूण 5000 मोठी झाडे व वेली, झुडूपे इ. प्रकारची रोपे लावणेचे काम पूर्ण झालेले आहे. सन 2016-2017 व 2017-2018 करिता देवाची उरळी येथील कचरा डेपो येथे सदर प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

सोमवार, दि. २२ जुलै २०१९ रोजी देवाची उरळी येथील कचरा डेपो येथे श्रीमती. रूबल अगरवाल, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांनी वडाच्या वृक्षांची लागवड करून अमृत वन प्रकल्पाचा (सन 2016-2017) प्रारंभ केला. त्यावेळी मा. मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे , मा. कार्यकारी अभियंता सुधीर कदम, मा. उद्यान अधिक्षक संतोषकुमार कांबळे, मा. उद्यान अधिक्षक श्रीमती. प्रिती प्रसाद, अमोल रूद्राके शाखा अभियंता व गुरूस्वामी तुम्माले, प्र. सहा. उद्यान अधिक्षक, पुणे मनपा उपस्थित होते.

सदरच्या प्रकल्पामध्ये वेलवर्गीय रोपे 128430, झुडूपे 2582 व 10450 इतक्या मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. सदर प्रकल्प ऑगस्ट 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.