पथ विभाग

Select PROJECTS & INITIATIVES

शहरी रस्ते उभारणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे (युएसडीजी)

शहरी रस्ते उभारणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे (युएसडीजी)
 

 

शहरातील रस्ते केवळ खासगी वाहनांसाठी नसतात. पादचारी, सार्वजनिक वाहतूक आणि सायकलस्वारांनादेखील रस्त्यांची तेवढ्याच प्रमाणात गरज असते. याशिवाय, उत्पादनांची विक्री आणि भेटी-गाठींसाठीदेखील रस्त्यावरील विविध जागा महत्त्वाच्या असतात. यामुळेच, आजूबाजूच्या परिसराचा विचार करून सर्वांना उपयुक्त ठरतील अशा पद्धतीने रस्त्यांची रचना करणे अत्यंत गरजेचे आहे.

हीच बाब लक्षात घेऊन आम्ही पुणे शहरात अधिकाधिक उत्कृष्ट रस्ते तयार निर्माण करण्यासाठी `नागरी रस्ते उभारणी मार्गदर्शक तत्त्वे’ तयार केली आहेत.

  • शहरात विविध ठिकाणी प्रत्येकाला वापरता येतील असे विविध आकाराचे असे रस्ते कसे बनवावेत याबाबत नागरी रस्ते निर्माणाची मार्गदर्शक तत्वे उपयुक्त ठरतात. 
  • या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे पुणे महानगरपालिकेतील अभियंते आणि नियोजनकर्त्यांना स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊन रस्त्यांची निर्मिती करण्यास मदत होईल.
  • पुणे  शहराच्या वर्तमान आणि भविष्यातील वाहतूकीच्या गरजा लक्षात घेऊन रस्त्यांची निर्मिती करण्यासाठी आणि त्याप्रमाणे अधिकाधिक चांगल्या रस्त्यांची रचना करता यावी, हा या मार्गदर्शक तत्वे तयार करण्यामागचा प्रमुख हेतू आहे.

`नागरी रस्ते उभारणी मार्गदर्शक तत्त्वे’ हा संपुर्ण दस्तावेज वाचण्यासाठी येथे क्लिक करा