कै. जनरल अरूणकुमार वैद्य स्टेडियम
पुणे महानगरपालिकेने सन १९९० मध्ये कै. जन. अरूणकुमार वैद्य स्टेडियम विकसित केले आहे. देशी खेळांसाठी हे मैदान विविध संस्था/ संघटनांना उपलब्ध करुन देण्यात येते. याठिकाणी २ बॉक्सिंग रिंग आहेत. या रिंग सध्या पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनला करार तत्त्वावर देण्यात आल्या आहेत. सराव व स्पर्धांसाठी या रिंग उपलब्ध करुन देण्यात येतात. स्टेडियममध्ये २ लॉन टेनिस कोर्ट आहेत. स्थानिक खेळाडू त्या ठिकाणी सराव करतात. कै. जन. अरूणकुमार वैदय स्टेडियम येथे एक व्यायामशाळा उपलब्ध असून येथे अनेक नागरिक व्यायामासाठी येतात. ही व्यायामशाळा लहूजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान यांना ९९ वर्षांच्या कराराने देण्यात आलेली आहे.