Quick Links

OVERVIEW & FUNCTIONING

मोटार वाहन विभाग हा पुणे महानगरपालिकेतील अत्यंत महत्वाचा विभाग आहे. या विभागाद्वारे इतर विभागांना आवश्यक त्या वेळी वाहने आणि इतर साहित्य पुरविण्यात येते. पुणे महानगरपालिकेच्या वाहतूक विभागामार्फत नागरिकांना खालील सुविधा दिल्या जातात.

  • पुणे शहरातील स्वच्छ ठेवण्यासाठी ओला आणि सुका कचरा संकलन आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूक
  • सार्वजनिक शौचालये, मुतारी आणि सांडपाण्याच्या नाल्याची स्वच्छता
  • अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञान आणि यंत्रे वापरून आगीपासून होणारी आर्थिक आणि जीवित हानी टाळणे
  • बाजारपेठा आणि सार्वजनिक स्थळे प्रकाशित करणे
  • शहरातील पाणीपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे
  • मृतदेहांचे विघटन करणे

मोटार वाहन विभाग हा स्वतंत्रपणे कार्य करत असून वरील जबाबदार्‍या पार पाडतो.

मोटार वाहन विभागाकडे एकूण १०८० वाहने आहेत. त्यापैकी ५५५ वाहने घनकचरा विभागासाठी अेला आणि सुका कचर्‍याचे संकलन आणि वाहतूक करण्यसाठी वापरण्यात येतात.

मोटार वाहन विभागामार्फत इतर विभागांना वाहने आणि पुरविण्यात आलेले इतर साहित्य -

घनकचरा व्यवस्थापन विभाग: डंपर प्लास्टर, बी.आर.सी., कचरा टिप्पर, मोठी घंटागाडी, लहान घंटागाडी, लहान जेटिंग मशिन

मल:निस्सारन विभाग: जेटिंग मशिन आणि चेंबर ब्लॉकेजची स्वच्छता, सकिंग मशीन, रिसायक्लर

इलेक्ट्रिक विभाग: रुग्णवाहिका, हेर्से मोटार

अग्शिमन विभाग: अग्नि इंजिन, ४० मीटर आणि ७० मीटरच्या शिड्या, अग्निवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याच्या नळ्या, रुग्णवाहिका

पाणीपुरवठा विभाग: पाण्याच्या टाक्या

उद्यान विभाग: जेसीबी, वृक्षतोड वाहने, डंपर्स

अतिक्रमण विभाग: जेसीबी, विविध वापरासाठीचे वाहन

याशिवाय संबंधित क्षेत्रिय कार्यालयांना मोटारी, जीप, विविध वापरासाठीचे वाहन

मोटार वाहन विभागाने त्यांच्याकडील बहुतेक वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसविली आहे. या माध्यमातून सर्व वाहनांच्या वाहतुकीवर देखरेख ठेवण्यात येते. पुण्याला `स्मार्ट सिटी’ बनविण्याच्या दृष्टिकोनातून हे एक पाऊल आहे.

PROJECTS & INITIATIVES

DEPARTMENT INFORMATION

HOD's Note

1955 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या यांत्रिक विभागाची स्थापना झाली असून पुणे महानगरपालिकेचा यांत्रिक विभाग ४२७, गुलटेकडी इंडस्ट्रियल एरिया, पुणे ३७ येथे आहे.

मोटर वाहनांची विभागणी तांत्रिक खर्चीच्या वेळेमुळे अनेक गुणामध्ये बदलली आहेत.

2007 मध्ये मोटर वाहन विभागात विविध प्रकारची व विविध मेकची 611 वाहने होती. पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन गावे विलीन झाल्याने पुणे शहराचा विस्तार झाला आहे. आजमितीस मोटर वाहन विभागाकडे विविध प्रकारची व विविध मेकची सुमारे 1282 प्रकारचे वाहन आहेत.

Key contact

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री.नितीन उदास

पदनाम: उप आयुक्त परिमंडळ क्र २

ई-मेल आयडी: nitin.udas@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931499

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. प्रसाद जगताप

पदनाम: उप अभियंता

ई-मेल आयडी: vehicle@punecorporation.org

मोबाइल क्रमांक:

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. चंद्रभान भदोरिया

पदनाम: कनिष्ठ अभियंता

ई-मेल आयडी: vehicle@punecorporation.org

मोबाइल क्रमांक:

विभागाची माहिती

विभाग पत्ता: मोटार वाहन विभाग, ४२७, गुलटेकडी, इंडस्ट्रियल एरिया, गुलटेकडी, पुणे ३७

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: vehicle@punecorporation.org

Public Disclosure
Key Documents
image