पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीजवळ असणाऱ्या दगडी पूलाला जोडून स्टीलचा जिना आहे. परंतु, दिव्यांग लोकांना हा जिना वापरताना अडचणी येऊ नयेत यासाठी त्याच ठिकाणी शेजारी आर.सी.सी. रॅम्पची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांना तळमजल्यापासून सहा टप्प्यांमध्ये हा रॅम्प वापरता येईल. जेष्ठ नागरिकदेखील या रॅम्पचा उपयोग करु शकतात. कोणीही सहजपणे या रॅम्पचा उपयोग करुन जुन्या दगडी पुलापासून जयवंतराव टिळक पूलापर्यंत पोहोचू शकते.
हे काम १५.०६.२०१३ रोजी सुरु झाले आणि ३०.०३.२०१६ रोजी पुर्ण झाले. या रॅम्पच्या बांधकामासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च आला होता.