OVERVIEW & FUNCTIONING

पाणीपुरवठा विभागामध्ये एकुण सेवकांची संख्या 1155 आहे. त्यामध्ये अभियंता  ते वर्ग 4 चा समावेश आहे. त्यापैकी स्थापत्य अभियंता संख्या 70 व विद्युत  अभियंता 30 संख्या आहे. आणि इतर कामगार यामध्ये पाणीवाला, सुरक्षा रक्षक, प्लंबर, मिस्त्री, पंपचालक, वायरमन, मोकादम, फिटर यांचा समावेश आहे.पाणी पुरवठाच्या विभागीय कार्यालया द्वारे पाणीपुरवठा वितरण, व देखभाल दुरूस्ती ची कामे करण्यात येतात. पाणी पुरवठाच्या पुणे शहरातील 6 विभागीय कार्यालयां साठी मुख्य अधिकारी म्हणुन 6 कार्यकारी  अभियंता यांची नेमणुक करण्यात आली आहे.

  • संपुर्ण पुणे शहराला पाणी पुरविणे ही पाणीपुरवठा विभागाची जवाबदारी आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत खालील प्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येतो.
  • धरणातून व कॅनल मधुन पाणी उपसा करणे.
  • अशुध्द पाण्यावर पुर्व क्लोरीनेशन प्रक्रिया करणे ,प्राथमिक प्रक्रिया, गाळणे व पुन्हा क्लोरीनेशन करणे  या मार्गाने पाणी सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या मानकापर्यंत शुध्द करणे.
  • प्रक्रिया टप्यात गुणवत्ता नियंत्रण आणी प्रयोगशाळा चाचणी जलकेंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचे पारेशन पाईप लाईन मधुन शहराच्या विविध भागातून उंचीवरील आणी जमीनीवरील पाणीसाठवण टाक्यात पारेशन करणे.
  • क्लोरीनेशन नंतरची प्रक्रिया करून अशी प्रक्रिया झालेल्या पाण्याचे वितरण लाईनस मधून पुरवठ्याच्या वेळेस विविध उंचीवरील आणि जमीनीवरील साठवण टाक्या यांच्या क्षेत्रातील नागरीकांना पाण्याचे वितरण करणे.
  • पाणी वितरण प्रणालीतील भिन्न स्थानातून दररोज पाण्याचे नमूने गोळा करणे, गोळा केलेल्या नमून्यांची प्रयोगशाळा चाचणी (रासायनिक विश्लेषण आणी सुक्ष्मजंतू शास्त्रीय चाचणी) आणि परीणामा संबधी प्रतिसादात्मक अभिप्राय, आवश्यकता असेल तर प्रतिबंध उपाय या संबधी विभागाला कळविणे.
  • सर्व कामांचे  अभिलेख ठेवणे.

DEPARTMENT INFORMATION

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री. अनिरुद्ध पावसकर

पदनाम: अधिक्षक अभियंता (पाणी पुरवठा विभाग)

ई-मेल आयडी: apawaskar@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931324

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: आजाद बागवान

पदनाम: कनिष्ठ लिपिक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9689834150

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्री. विशाल जगताप

पदनाम: कनिष्ठ लिपिक

ई-मेल आयडी:

मोबाइल क्रमांक: +91 9767177098

विभागाची माहिती

विभाग पत्ता: पाणीपुरवठा विभाग कक्ष नम्बर 134, पुणे महानगरपालिका इमारत शिवाजीनगर पुणे 5

दूरध्वनी क्रमांक:

ई-मेल आयडी: addcews@punemuncipalcorportion.org

image