पाणी संवर्धन

पाण्याची बचत करणे का महत्त्वाचे आहे‍?

जगभरात वापरण्यात येणार्‍या एकूण पाण्यापैकी ६९ टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. १९६० सालाच्या तुलनेत २००० साली पाण्याचा वापर दुप्पट वाढला. पाण्याच्या वापरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाण्याची बचत केली नाही तर एकदिवस पाणी संपू शकते. प्रत्येकाला केवळ पिण्यासाठीच नव्हे तर जगण्यासाठी आवश्यक असलेले धान्य पिकविण्यासाठीही पाण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याची बचत करणे काळाची गरज आहे. पाण्याच्या गैरवापरामुळे मनुष्याच्या अस्तित्वाला उपयुक्त ठरणारे मासे आणि इतर जलचरांना धोका निर्माण होत आहे. तसेच पाण्याच्या बचतीमुळे पृथ्वीचा समतोल साधला जातो.

जेवढा पाण्याचा वापर वाढतो तेवढा पाणीपुरवठा आणि पाण्यावरील प्रक्रिया करणे वाढते. पाण्याच्या अतिरिक्त वापर करताना जर शुद्ध न केलेले पाणी वापरावे लागले तर आरोग्याच्या समस्या उद्‌भवू शकतात. पाण्याची बचत केल्याने जलशुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पांच्या उभारणीसाठी आणि दुरुस्ती-देखभालीसाठी होणारा खर्च कमी होऊ शकतो. पर्यायाने जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेसाठी लागणारी वीजेचीही बचत होते. हे ही लक्षात ठेवा की, तुमच्या घरी येणारे शुद्ध पाणी तुम्हाला विनामूल्य मिळत नाही, त्यामुळे जर तुम्ही पाण्याची बचत करून तुम्ही पैशाचीही बचत करू शकता.

घरात पाणीबचत करण्यासाठी टिप्स

स्वयंपाकघरात 

 • वापर न केलेले पाणी एका बादलीमध्ये एकत्र करून ते झाडांना देण्यासाठी वापरा.
 • भाजी, फळे नळाखाली धुण्याऐवजी एका भांड्यात धुवा.
 • हाताने भांडी घासत असताना नळाचे पाणी वापरू नका. दोन भांड्यात पाणी घ्या. एका भांड्यात साबणाचे पाणी तर दुसर्‍या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या. या दोन भांड्यातील पाणी भांडी धुण्यासाठी वापरा.
 • डिशवॉशरमध्ये भांडी घालण्यापूर्वी धुवू नका.
 • ज्यावेळी नवे डिशवॉशर खरेदी कराल त्यावेळी पाण्याची बचत करणारे डिशवॉशरच खरेदी करा.

स्नानगृहामध्ये 

 • स्नान करताना भांड्याने पाणी घ्या. वाहत्या पाण्याचा वापर करू नका.
 • दाढी करताना किंवा दात घासताना बेसिनमधील पाणी बंद करा. हवा तेव्हाच नळ सुरू करा.
 • स्नानगृहात लहान शॉवर्सचा वापर करा किंवा ज्या टबमध्ये स्नान कराल त्यामध्ये एक तृतीयांशच पाणी भरा.
 • पाण्याची बचत करणारे शॉवर्स बसवा.
 • शौचालयात फ्लशद्वारे पाण्याचा कमी वापर करा.

कपडे धुताना 

 • ज्यावेळी वॉशिंग मशीनच्या क्षमतेएवढे कपडे धुवायचे असतील त्याचवेळी मशिनचा वापर करा.
 • मशिनच्या वरून कपडे घालण्याची सुविधा असलेल्या वॉशिंग मशीनपेक्षा समोरून कपडे घालता येतील अशा मशिनचा वापर करा. अशा मशिनला कमी पाणी लागते.
 • ज्यावेळी मशिनशिवाय कपडे धुवत असाल त्यावेळी वाहत्या (नळाच्या) पाण्याचा वापर करू नका.
 • कपडे धुतलेले पाणी फरशी पुसण्यासाठी किंवा शौचालयासाठी वापरा.

घराबाहेर 

 • दुचाकी किंवा चारचाकी वाहन धुताना पाण्याच्या नळाऐवजी बकेटमधील पाण्याचा वापर करा.
 • घरासमोरचे अंगण स्वच्छ करताना पाण्याच्या नळाऐवजी बकेटमधून पाण्याचा वापर करा.
 • बंद करण्याची व्यवस्था असलेले पाण्याचे नळ बसवा.
 • दुष्काळी परिस्थितीवर मात करणारे रोप तुमच्या घरातील उद्यानामध्ये लावा. अशी रोपे पाणी टिकवून ठेवतात आणि पाण्याची बचत होते.
 • तुमच्या उद्यानातील रोपांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतरच पाणी घाला. त्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याचा अपव्यय टाळता येईल.

सर्व ठिकाणी: 

 • वापर झाल्यानंतर नळ पूर्णपणे बंद करा. त्यातून थेंब थेंब पाणीही गळू देऊ नका. पूर्णपणे बंद केल्यावरही पाणी गळत असेल तर नळाची दुरुस्ती करा.

पाणी बचतीच्या या साध्या-सोप्या टिप्स तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना सांगा.