OVERVIEW & FUNCTIONING

Select Sub Departments

पाणीपुरवठा

Water Distribution

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मीटरद्वारे पाणीपुरवठा करणे हा एकमेव पर्याय आहे. जे मोजले जात नाही त्याचे व्यवस्थापन करता येत नाही. एकदा का मीटरद्वारे पाणी पुरविण्याची व्यवस्था आणि त्यावर देखरेख करणारी व्यवस्था उभारली की पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे शक्य होते. त्यातून पाणीबचतीचा प्रचार-प्रसारही करता येतो. ग्राहकांपर्यंत पाणी पोहोचण्यापूर्वी ते प्रक्रिया प्रकल्पात येते आणि तेथून पुरवठ्यासाठी तयार होते. या प्रक्रियेवर देखरेख करणारी सुयोग्य यंत्रणा उभारली की पाण्याचे अधिक समान वितरण करता येते. अशी यंत्रणा पंपिंग केंद्रांवर कार्यान्वित करण्यात आलेली आहे. शिवाय जलाशयांजवळही पाण्याची मोजणी करण्यासाठी मीटर्स लावण्यात आलेले आहेत. त्यातून पाण्याच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवण्यात येते.

ज्यावेळी नागरिक वापरत असलेल्या पाण्यावर शुल्क आकारण्यात येईल, त्यावेळीच पाण्याच्या बचतीचे महत्व अधोरेखित होईल. युकेमधील उदाहरणावरून हे अगदी स्पष्ट होईल. तेथे पाण्याचे मीटर बसविल्यानंतर पाण्याचा वापर दहा टक्क्यांनी कमी झाला. तर जर्मनीमधील हॅमबर्ग येथेही मीटर बसविल्यानंतर पाण्याचा वापर १८ टक्क्यांनी कमी झाला. पाण्याच्या बचतीमुळे आपोआपच पाण्याच्या प्रक्रियेवर होणारा खर्च कमी होतो.

पाण्याच्या दबावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहज हाताळता येण्याजोगे उपकरणे वापरता येतात. ही उपकरणे महत्वाची भूमिका पार पडतात. डीएमए (शहर मीटर परिसर) या नमुन्याची निर्मिती आणि अंमलबजावणी उपयुक्त ठरत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याच्या प्रवाहावर आणि दबावावर ठिकठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी जीपीआरएस तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा बसवून रिमोट कंट्रोल पद्धतीचा वापर करून केंद्रीय ठिकाणी संगणकावर सर्व माहिती एकत्र संकलित करता येणे सहज शक्य आहे. तसेच वापरकर्त्यांकडे (नागरिकांकडे) बसविण्यात आलेल्या मीटरवरील माहिती अॅटोमॅटिक मीटर रिडिंग व्यवस्थेद्वारे पाहता येणेही शक्य आहे.

अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे पाणीपुरवठा व्यवस्थेला `उद्योग’ म्हणून विकसित करण्याचा विचार करायचा असेल आणि यामधील निर्मिती, साठवणूक आणि वितरण प्रक्रिया सुस्थितीत आणायची असेल तर देखरेखीची यंत्रणा अत्यंत आवश्यक आहे.

पाणीपुरवठ्यासाठीची सार्वत्रिक मीटर पद्धत

कोणत्याही स्रोताद्वारे पुरविण्यात येणार्‍या बाबीचा मोजणी न करता पुरवठा केला तर तिचा अपव्यय होण्याची शक्यता असते. तसेच किती पुरवठा केला हे जर माहिती नसेल तर किती अपव्यय झाला आहे हे ही समजत नाही. जर पुरविण्यात येणार्‍या बाबीची मोजणी न करता पुरवठा केला तर विवेकशीलपणे तिचा वापर करण्यासाठी वापरकर्ता प्रोत्साहित होत नाही. हीच बाब पाण्यासाठीही लागू होते. पाण्याचा पुरवठा मोजणी करूनच देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय आणि गैरवापर कमी होतो. मात्र मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या पद्धतीला जास्त बिल येईल या काळजीने आणि मीटरबिलामध्ये मानवी हस्तक्षेप होईल या भीतीने विरोध करण्यात येत आहे. याशिवाय पाण्याचे मीटर बसविल्यानंतर काही वर्षांनी मीटरमध्ये गाळ बसला तर पाण्याचा पुरवठा कमी होईल, अशा भीतीनेही विरोध करण्यात येत आहे. वास्तविक, हा देखभालीचा प्रश्न असून दर पंधरा दिवसांनी गाळ स्वच्छ करण्यात येतो. पुणे महानगरपालिका दर पंधरा दिवसांनी मीटरमधील गाळ काढण्याचे काम करणार आहे.

Water Distribution

सार्वत्रिक मीटर बसविणे प्रस्तावित असलेल्या शहरांची यादी:

 1. नवी मुंबईमधील (एएमआर) काही भागात
 2. नवी मुंबई (एएमआर)
 3. नागपूर
 4. गुवाहटी
 5. नवी दिल्ली
 6. म्हैसूर

सार्वत्रिक मीटर बसविण्यात आलेले शहर/गाव :

 1. मलकापूर (एएमआर)
 2. जलोची
 3. थानगाव
 4. अमरावती
 5. अंबरनाथ आणि बदलापूर
 6. यवतमाळ
 7. हुबळी धारवाड (काही भाग)
 8. पाचगणी
 9. सातारा (एमजेपीचा परिसर)