पाणीपुरवठा विभाग

Select DEPARTMENT PROJECTS

जलशुद्धीकरण केंद्र पर्वती

  • क्षमता: ५०० दशलक्ष लिटर प्रतिदिन
  • सर्वसाधारण अंदाजित खर्च: रुपे १७,९०६ लाख
  • निविदा किंमत: रुपये १,६१,१०,००,०००
  • कंत्राटदार: मेसर्स डिग्रीमोंट लि
  • कामाचे आदेश: जावक क्र. २०१७, दिनांक ७ फेब्रुवारी २०१४

कामाचे स्वरुप

पर्वती येथील केंद्रात दररोज ५३५ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. येथे शुद्ध करण्यात आलेल्या पाण्याचा प्रामुख्याने पुणे शहर, एसएनडीटी आणि चतुश्रृंगी परिसरात पाणीपुरवठा करण्यात येतो. पुणे कॅटोंमेंट परिसरात असलेला जलशुद्धीकरण प्रकल्प १२५ वर्षे जुना असून तेथे दररोज ३६० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. तेथील पाण्याच्या टाक्यांची क्षमता संपत आल्याने या प्रक्रिया केंद्राची पुननिर्मिती करणे गरजेचे आहे. हा जलशुद्धीकरण प्रकल्प पुणे कॅटोंमेंटच्या कक्षेत येत असल्याने आणि प्रकल्पाची पुननिर्मितीसाठी कॅटोंमेंट परिसरात कोठेही जागा उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याने पर्यायी व्यवस्थेचा विचार करणे आवश्यक आहे.

प्रतिदिन ५०० दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या रुपये १७,९०६ लाख रुपयांच्या (मान्य प्रकल्पाची किंमत + दुरुस्ती + देखभाल खर्च) प्रकल्पासाठी कोटेशन मागविण्यात आले. पर्वती जलशुद्धीकरण प्रकल्पाशेजारी जलशुद्धीकरण पंपिंग केंद्राची उभारणी, बांधणी, चाचणी आणि पाच वर्षांसाठी यशस्वी अंमलबजावणी, दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी प्राप्त कोटेशनमधून मेसर्स डिग्रीमोंट लि. यांनी सर्वात कमी दराचे कोटेशन दिले. त्यामुळे ७ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांना कार्यादेश देण्यात आले. हा प्रकल्प ३० महिन्यात पूर्ण होईल तर पुढील पाच वर्षे दुरुस्ती आणि देखभालीचे काम सुरू राहील.

या नव्या प्रकल्पाच्या योजनेतून होणारे लाभ: 

कॅटोंमेंट येथे दररोज ३६० दशलक्ष लिटर क्षमता असलेला प्रकल्प थांबवून पर्वती जलशुद्धीकरण केंद्र येथे उभारण्यात येणार्‍या नव्या प्रकल्पाद्वारे दरोज ५०० दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धीकरण होणार आहे. दरम्यान कॅटोंमेंट येथील जलशुद्धीकरण प्रकल्प थांबवून त्याची पुनर्बांधणी होईपर्यंत पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा करता येऊ शकेल.

या जलशुद्धीकरण केंद्राला खडकवासला येथून २५०० मिलिमीटर व्यास असलेल्या पाईपद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शिवाय १५०० मिलिमीटर व्यास असलेल्या पाईपनेही पाणीपुरवठा होणार आहे. या कामी मे. शाह टेक्निकल कन्सल्टंट हे तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. या प्रकल्पाच्या बहुतेक कामाला सुरवात झाली आहे.