यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हे शहरातील कोथरुड परिसरातील सांस्कृतिक केंद्र असून, येथे विविध कार्यक्रमांसाठी सभागृह आणि प्रदर्शन हॉल उपलब्ध आहे. सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव सभागृहाला देण्यात आले आहे. विविध विषयांवरील कार्यशाळा, चर्चा, भाषण, चर्चासत्रे, तसेच सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आणि धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी या सभागृहाचा वापर केला जाऊ शकतो. सध्या, या नाट्यगृहाचा उपयोग प्रामुख्याने नाटक आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी होतो.
पत्ता - डी पी रोड, शिवाजी पुतळ्याजवळ, कोथरुड, पुणे, महाराष्ट्र- ४१११०३८
गुगल नकाशा - https://goo.gl/qHXtro
कोनशिला सोहळा : |
गुरुवार, २८ ऑक्टोबर, १९८६ |
यांच्या शुभहस्ते : |
मा. शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य |
उद्घाटन सोहळा : |
शनिवार, २५ नोव्हेंबर, २००० |
यांच्या शुभहस्ते : |
मा. विजयसिंह मोहीते पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य |
संपर्क : |
020 - 25395232 |
सभागृहाविषयी माहिती
सभागृहाचा आकार
व्यासपीठाचा आकार |
60’ x 40’ (एकुण) |
(प्रत्यक्षात वापरायोग्य जागा) |
30’ x 20’ (एकुण) |
आर्ट गॅलरी |
72’ x 28’ (एकुण) |
पार्किंग एरिया |
60’ x 300’ (एकुण) |
आसनक्षमता
सभागृहाची आसनक्षमता |
893 (एकुण) |
तळमजला |
436 |
बाल्कनी |
157 |
सुविधा
- संपुर्ण सभागृह वातानुकुलित
- वाहने पार्किंगसाठी पे अँड पार्क सुविधा
- उपहारगृह
- हस्तकला, चित्रे व आगामी कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मांडण्यासाठी आर्ट गॅलरी उपलब्ध
- कलाकारांसाठी जेवण आणि राहण्याची सोय
- विशेष पाहुण्यांसाठी व्ही.आय.पी. खोल्या उपलब्ध
कार्यक्रमाच्या वेळा
सकाळी |
स. ९.०० ते ११.०० |
दुपारी |
दु. १२.३० ते ३.३० |
संध्याकाळी |
सायं. ५.०० ते ८.०० |
रात्री |
रात्री ९.३० ते १२.३० |
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची आणखी एक खासियत अशी आहे की, हे सभागृह दिवाळी/नाताळ/उन्हाळ्याच्या सुट्यांदरम्यान बालनाट्यांसाठी उपलब्ध करुन दिले जाते. परंतु, यासाठी आगाऊ बुकिंग करणे आवश्यक असून या कार्यक्रमांसाठी सभागृह सकाळी ९ ते ११ दरम्यान उपलब्ध करुन दिले जाईल.
सभागृहातील भाड्याचे दर
क्र. |
कार्यक्रम |
इतर दिवसांचे दर |
सुटीच्या दिवसाचा दर |
---|---|---|---|
1 |
मराठी नाटक, ऑर्केस्ट्रा, तमाशा, जादूचे खेळ, हिप्नॉटिझ्म, सोलो कार्यक्रम, लोकनृत्य इत्यादी( कमाल तिकीट- रु.60/-) तिकीटाचा दर यापेक्षा जास्त असेल तर दीडपट अधिक भाडे आकारले जाईल. टीपः दर महिन्यातील पहिल्या दोन संगीत कार्यक्रमांसाठी अर्धे भाडे आकारले जाईल. (३ तासांसाठी |
सभागृहाचे भाडे रु. २,५०० + सेवा कर + द्वारपाल
|
सभागृहाचे भाडे रु. ३,००० + सेवा कर + द्वारपाल
|
अनामत रक्कम: रु.५,००० |
अनामत रक्कम: रु.५,००० |
||
2 |
नाटक कंपनी(रु.60/- पेक्षा अधिक दराने तिकिट विक्री करणारी) (तीन तासांच्या कार्यक्रमासाठी) |
सभागृहाचे भाडे रु. ३,७५० + सेवा कर + द्वारपाल |
सभागृहाचे भाडे रु. ४,५०० + सेवा कर + द्वारपाल |
|
|
अनामत रक्कम: रु.५,००० |
अनामत रक्कम: रु.५,००० |
3 |
इतर खासगी कंपन्या(नाटक कंपनी वगळुन, तीन तासांच्या कार्यक्रमासाठी) |
सभागृहाचे भाडे रु. १०,०००+ सेवा कर + द्वारपाल |
सभागृहाचे भाडे रु. १०,०००+ सेवा कर + द्वारपाल |
|
|
अनामत रक्कम: रु.५,००० |
अनामत रक्कम: रु.५,००० |
4 |
आर्ट गॅलरी(१ दिवसाकरिता) |
आर्ट गॅलरीसाठी भाडे रु.१,५०० + सेवा शुल्क
|
आर्ट गॅलरीसाठी भाडे रु.१,५०० + सेवा शुल्क
|
|
|
अनामत रक्कम: रु.५,००० |
अनामत रक्कम: रु.५,००० |
टीपः मा. आयुक्त, धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे नोंद असलेल्या धर्मादाय संस्थांच्या(प्रवेशशुल्क अनिवार्य नसलेल्या) कार्यक्रमांसाठी रु.३,००० अधिक सेवा शुल्क(इतर दिवशी) आणि रु.३,५०० अधिक सेवा शुल्क(सुटीच्या दिवशी) एवढे शुल्क आकारले जाईल.
अतिरिक्त बाबींसाठी भाडे
क्र. |
अतिरिक्त बाबी |
प्रमाण |
सध्याचा भाडेदर |
---|---|---|---|
1 |
व्ही.आय.पी. रुम |
प्रति सत्र |
500/- |
2 |
व्ही.आय.पी. खुर्ची |
1 |
20/- |
3 |
टेबल |
प्रत्येक सत्रात एक |
25/- |
4 |
प्लॅटफॉर्म/लेव्हल |
प्रत्येक सत्रात एक |
10/- |
5 |
रांगोळीची स्वच्छता |
प्रत्येक कार्यक्रमासाठी |
100/- |
6 |
बाहेरील फाटकावर कमान |
प्रतिदिन |
200/- |
7 |
रंगीत पडदे (प्रति सत्र) |
1 |
50/- |
8 |
500 वॅट हॅलोजनर स्पॉट अँड आयर्न |
1 |
30/- |
9 |
1000 वॅट हॅलोजनर स्पॉट अँड आयर्न (कंपनी) |
1 |
20/- |
10 |
500 वॅट हॅलोजनर स्पॉट अँड आयर्न(कंपनी) |
1 |
10/- |
11 |
2000 वॅट सोलार(सभागृह) |
1 |
100/- |
12 |
2000 वॅट सोलार(कंपनी) |
1 |
50/- |
13 |
डिस्को लाईट्स (कंपनी) |
1 |
10/- |
14 |
लाईट इफेक्ट 1000 वॅट (कंपनी) |
(1) |
20/- |
15 |
सभागृह कॉलर माईक आणि कॉर्डलेस माईक |
1 |
350/- |
16 |
ऑडीओ इनपुट अँड आऊटपूट (कंपनी) |
प्रत्येक कार्यक्रमासाठी |
100/- |
17 |
व्हिडिओ शुटिंग (कंपनी) |
प्रति कॅमेरा |
150/- |
18 |
टी.व्ही. मॉनिटर अँड कम्प्युटर (कंपनी) |
1 |
10/- |
19 |
एल.सी.डी. प्रोजेक्टर अँड फिल्म प्रोजेक्टर |
1 |
20/- |
20 |
साधा माईक आणि मायक्रोफोन (सभागृह) |
1 |
200/- |
21 |
सभागृह टेप रेकॉर्डर |
1 |
100/- |
22 |
सभागृह सीडी प्लेयर |
1 |
200/- |
23 |
आर्ट गॅलरीमध्ये सभागृह स्पीकर मॉनिटर आणि एक माईक |
1 |
300/- |
इतर तपशील
- इमारत आणि भोवतालच्या परिसरातील विजेसाठी लागणारा खर्च- मीटर रिडिंग आणि लोडप्रमाणे
- विजेच्या अतिरिक्त सोयीसाठी तसेच सभागृहाच्या आजूबाजूच्या परिसरातील मोकळ्या जागेत मंडप किंवा स्टॉल टाकण्यासाठी पुर्वनियोजित दराने शुल्क आकारले जाईल
- कॅंटीन आणि वाहनतळ वापरण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून पुर्वपरवानगी आवश्यक
- सभागृह किंवा इतर संबंधित वस्तूची हानी झाल्यास, नुकसानभरपाई द्यावी लागेल
आरक्षणासंदर्भातील धोरण
- सभागृह दरवर्षी चार स्लॉटमध्ये आरक्षित केले जाते ,
- जानेवारी ते एप्रिल
- मे ते ऑगस्ट
- सप्टेंबर ते डिसेंबर
- प्रत्येक सोमवार ते बुधवार आणि शुक्रवारी दररोज दुपारी १२.३०, संध्याकाळी ५.०० वाजता आणि रात्री ९.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व गुरुवार आणि रविवार हे दिवस शासकीय सुटी म्हणून गृहीत धरले जातात.
- अर्जदाराने या चार महिन्यांच्या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी महानगरपालिकेच्या विहीत अर्जाचा नमुना सादर करावा. याशिवाय, कंपनी किंवा संस्थेच्या लेटरहेडसह अर्जाचा नमुना स्वीकारला जाईल. आपले अर्ज सभागृह कार्यालयात स.१०.३० ते सायं.५.३० पर्यंत खाली नमूद केलेल्या कालावधीत स्वीकारले जातील. नमूद कालावधीनंतर सादर झालेले अर्ज गृहीत धरले जाणार नाही.
क्र. |
चार महिन्यांचा स्लॉट |
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी |
1 |
जानेवारी ते एप्रिल |
१५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर |
2 |
मे ते ऑगस्ट |
१५ ते २५ मार्च |
3 |
सप्टेंबर ते डिसेंबर |
१५ जुलै ते २५ जुलै |
- आरक्षण अर्जासोबत अनामत रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.
- कार्यक्रमाच्या नियोजित तारखेपुर्वी १५ दिवस अगोदर सभागृह आरक्षित करणे बंधनकारक आहे. याशिवाय, नियोजित वेळेत सभागृहाकडे अनामत रक्कम जमा न झाल्यास अर्ज आपोआप रद्द होईल. यादरम्यान, दुसऱ्या कार्यक्रमांसाठी परवानगी देण्याचा अधिकार सांस्कृतिक केंद्र विभागाकडे राखीव आहे.
इतर दिवसांचे आरक्षण
- इतर दिवस म्हणजे शासकीय सुटी नसताना सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार हे दिवस
- यापैकी कोणत्याही दिवशी सभागृह आरक्षित करण्यासाठी सांस्कृतिक केंद्रे विभागाच्या मुख्य व्यवस्थापकाच्या नावे लिहीण्यात आलेला अर्ज कार्यक्रमाच्या किमान १४ दिवस आधी सादर करणे बंधनकारक आहे. सभागृह कार्यालयात सकाळी ११.३० पर्यंत अर्ज सादर करावा. यावेळी अनामत रक्कम सादर करणेदेखील बंधनकारक आहे.
- अर्जदाराला कार्यक्रमाच्या १४ दिवसआधीच परवानगी कळविली जाईल. इच्छुक संस्था किंवा कंपन्यांनी त्याचदिवशी भाड्याची संपुर्ण रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.
- इतर दिवसांसाठी नियोजित वेळेत म्हणजेच कार्यक्रमाच्या १४ दिवसांपुर्वी कोणतेही अर्ज दाखल न झाल्यास पुणे महानगरपालिकेला आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. अशावेळी, कार्यक्रमाच्या आदल्यादिवशी अर्ज करणार्
- यांनादेखील सभागृह वापरण्याची परवानगी दिली जाईल. अर्जदारांना कार्यक्रमाच्या दिवशी भाडे व अनामत रक्कम भरावी लागेल.
- आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शने आयोजित करण्यासाठी २ महिने आधी आरक्षण करणे बंधनकारक आहे.
दुरुस्ती व देखभाल
सभागृहासंबंधी सर्व देखभाल आणि दुरुस्त्यांची जबाबदारी पुणे महानगरपालिकेच्या भवन रचना, बांधकाम परवाना आणि विद्युत विभागाकडे आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा- मा. प्रशासकीय अधिकारी, सांस्कृतिक केंद्रे, पुणे महानगरपालिका
दूरध्वनी क्रमांक- 020 - 25395232