Quick Links

OVERVIEW & FUNCTIONING

सन १९५३ मध्ये पुणे महानगरपालिकेने पार्वती पायथ्याजवळ पेशवे पार्कची स्थापना केले ज्याठिकाणी पूर्वी पेशव्यांचे स्वत:चे प्राणीसंग्रहालय होते. केवळ ७ एकर जागेमध्ये बंधिस्त पिंज्यांमध्ये येथे पर्यटकांना प्राणी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. हे त्याकाळचे प्राणीसंग्रहालयांपैकी एक होते ज्याचा उद्देश केवळ लोकांचे मनोरंजन असे.

सन १९९२ मध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर प्राणीसंग्रहालयांची स्थिती पूर्णपणे बदलून शास्त्रीय पद्धतीने वन्यप्राणी संवर्धन केंद्र म्हणून नवी ओळख निर्माण झाली. सन १९९६ मध्ये कात्रज येथील १३० एकर जागेत नैसर्गिक आभासाचे, प्राणी प्रजोत्पनासाठी, वन्यजीव संवर्धन शिक्षण व संशोधन करण्यासाठी  नवीन प्राणीसंग्रहालयाचा विकास करण्यात आला. १४ मार्च २०१४ रोजी राजीव गांधी प्राणीसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र असे नामकरण करून नवीन प्राणीसंग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. सुरूवातीला हरीण, माकड, अस्वल, वाघ, हत्ती इत्यादी साठी नैसर्गिक आभासाचे खंदक बांधण्यात आले. १९८६ साली स्थापन करण्यात आलेले जुने सर्पउद्यान देखील नवीन प्राणिसंग्रहालयात समाविष्ट करण्यात आले.
अधिक वाचा 

image